गुंजेवाहीत पुतण्याने केला सख्या काकाच्या खून, पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
पळून गेलेल्या पुतणयास अगदी काही तासांतच सिंदेवाही पोलिसांनी केली अटक

मुकेश शेंडे, सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही : –सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की दिनांक 14/ रोजी फिर्यादी नामे जगदिश सोमेश्वर वाढई रा. गुंजेवाही यानी तक्रार दिली की यातील आरोपी नामे दिपक झिटुजी वाढई वय 40 वर्ष रा गुंजेवाही याचे सोबत म्रूतक नामे मारोती गोविंदा वाढई वय 65 वर्ष व त्याचा मुलगा नामे सतीश मारोती वाढई वय 37 वर्ष दोन्ही रा गुंजेवाही यांचेसोबत घराच्या जागेच्या कारणावरुन भांडण चालु असतांना फिर्यादी आणि इतर नातेवाईक सोडविण्यास आले असता यातील आरोपीने मूतक आणि जखमी यांना काठीने मारहाण करुन गंभीररित्या जखमी केले. मूतक यास उपचाराकरीता सामान्य रुग्णालय चंद्रपुर येथे नेत असता मरण पावला अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरुन अप क्र 195/2021 कलम 302,324 भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. यातील आरोपी नामे दिपक झिटुजी वाढई याचे कपाळावर मार लागल्याने तो ग्रामीण रुग्णालय सिन्देवाही येथे उपचार घेवुन पळुन गेला. त्याचा शोध घेण्याकरीता पोलीस पथक गुंजेवाही य़ेथे रवाना करुन काही तासाचे आत आरोपीला अटक करण्यात आली असुन सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी श्री मिलींद शिंदे सा यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सिन्देवाही सपोनी योगेश घारे आणि त्यांचे सहकारी तपास करीत आहे.