धर्मविर संभाजी महाराज जयंती साधेपणाने साजरी.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
माहुर :– माहुर तालुक्यातील वाई बाजारच्या मुख्य चौकातील शिवस्मारका जवळ दि.१४ मे रोजी सायं.६ वा.शिवसेनेचे युवानेते यश खराटे यांचे हस्ते धर्मविर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून विधींवत पुजन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून छत्रपती संभाजी राजे यांच ३६४ वी जयंती हर्षोल्हासात मात्र तेवढ्याच साधेपणाने साजरी करण्यात आली.
याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष अमजद खाॅ लाल खाॅ, माजी.ग्रा.प.सदस्य अमजद पठाण, नितीन कन्नलवार ज्येष्ठ पत्रकार सुभाष खडसे, कार्तिक बेहेरे पाटील, प्रशांत शिंदे, प्रमोद शिंदे, अमन पठाण, बाळु चव्हाण, अकाश सातव, शे.अन्नुभाई, शे.जावेद सर, शिवम कलाणे, ओमकार सातव, रघुविर कलाणे, बालाजी राऊत, सतिष गांवडे आदिंनी छत्रपतींच्या नावाचा जयघोष करून महाराजांना आदरांजली वाहिली.