सांगलीत भटक्या कुत्र्यांनी केला मनपाच्या स्वच्छता निरीक्षकावर हल्ला, गंभीर जखमी.

52

✒सांगली जिल्हा प्रतिनिधी✒
सांगली,दि15 मे:- सांगली शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली शहरातील भटक्या कुत्र्यांनी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीररीत्या जखमी झाले आहे.

शनिवारी सकाळी ही घटना घडली. सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. यापूर्वी मिरज शहरात अनेकवेळा भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ले केले आहेत. यामध्ये काही लहान मुले गंभीर जखमी झाली होती. तर काही जणांचा मृत्यू झाला होता. लहान मुलांसह नागरिकांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढल्याने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी नागरिकांतून मागणी होत होती. परंतु आरोग्य विभागाचे याकडे वारंवार दुर्लक्ष होत होते.

आज सकाळी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी प्रभाग क्रमांक 19 मध्ये गेले होते. त्यावेळी भटक्या कुत्र्यांच्या टोळीतील एका कुत्र्याने मद्रासी यांच्या अंगावर झेप घेतली. त्यांना खाली पाडून त्यांच्या चेहर्यातवर हल्ला केला. यामध्ये मद्रासी गंभीर जखमी झाले. महापालिका कर्मचार्यांकवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यावर आतातरी महापालिकेकडून कुत्र्यांचा बंदोबस्त होणार का? असा प्रश्न नगरसेवक आणि नागरिकांतून विचारला जात आहे.