दोन वेगवेगळ्या कार अपघातात ५ जखमी
✍ रेश्मा माने ✍
महाड शहर प्रतिनिधी
८६००९४२५८०
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास महाड शहरा नजीक सीमा गार्डन हॉटेल समोर दोन कार समोरा समोर . धडकून झालेल्या या अपघातात दोन्ही कार मधून प्रवास करणारे ५ प्रवासी जखमी झाले असून या सर्वांना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले आहेत
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड शहरा नजीक सीमा गार्डन हॉटेल समोर मुंबई बाजूकडे जाणारी स्वीफट डिझायर कार क्रमांक एम एच ०४ जी यु ६६०९ या वर गोवा राज्याकडे जाणारी एक्स यु वी क्रमांक एम एच ०१ डी टी ६६५४ ही एका वाहनाला ओव्हर टेक करताना विरुद्ध दिशेने येऊन कार वर धडकली या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दोन्ही वाहना मधून रवींद्र पंढरीनाथ तावडे -६१,मनाली रवींद्र तावडे -२५ दोन्ही राहणार उमर खाडे मुंबई ,समीर शशिकांत कदम – ४१ कळवा ठाणे , नलीनी बाबा ठाकूर -५० भांडुप , विहान समीर कदम -५ कळवा ठाणे असे पाच प्रवासी जखमी झाले .अपघाताची माहिती महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांना मिळताच पोलीस हवालदार मंदार लहाने आणि पोलीस शिपाई झेपले यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना उपचारा साठी ग्रामीण रुग्णालय महाड येथे दाखल केले.