लॉयडस मेटल कंपनी कडून सुरु केला जाणारा मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटल एटापल्ली येथे सुरु करण्याबाबत निवेदन….
✒धनराज आर. वैरागडे ✒
9421527972
गडचिरोली उपजिल्हा प्रतिनिधी
कॉम्मुनिस्ट पार्टी ऑफ इंडिया च्या ऑल इंडिया स्टुडेंट विंग च्या राष्ट्रीय अधिवेशन दिनांक 15 मे ला चेन्नइ येथे झाले त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री जितेंद्र आव्हाड कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते लॉयडस मेटल कंपनी कडून एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह खनिज पहाडी वरिल लोह खनिज उत्खननाची लीज घेउन लोह खनिजाचे उत्खनन व वाहतुक केली जात आहे. सदर लीज मंजूरी प्रसंगी शासनाच्या धोरणानुसार कंपनी कडून स्थनिक रहिवासी नागरिकांना सेवा व मुलभुत सोयी सुविधा उपलब्ध करणेची तरतुद आहे. सदर हॉस्पीटल हे एटापल्ली च्या नावाने नागेपल्ली येथे सुरु केले जाणार आहे. अशी माहिती आहे. जर वरिल हॉस्पीटल एटापल्ली येथे सुरु केले नाही तर स्थानिक नागरिकांना या सेवा सोयीचा कोणताही लाभ होणार नाही. त्यामुळे वरील हॉस्पीटल एटापल्ली येथेच सुरु करण्याची आवश्यकता आहे. या विषयी चर्चा करून लॉयडस मेटल कंपनी कडुन सुरु केला जाणारे मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल नागेपल्ली ता. अहेरी ऐवजी एटापल्लीतच सुरु करण्यात यावे, असे निवेदन कॉम. सुरज जककुलवार आणि कॉम. शुभम वांनामवार यांनी दिले.