कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र तळेगाव मळे येथे शनेश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा

55

कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र तळेगाव मळे येथे शनेश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा

सुनील भालेराव

कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र तळेगाव मळे येथे श्री शनेश्वर जन्मोत्सवानिमित्त श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते .

या सोहळ्यास उपस्थित राहून श्री क्षेत्र सरला बेट येथील गोदाधामचे मठाधिपती प.पू.महंत रामगिरी महाराज यांच्या अति मधुर वाणीतून श्रीमद् भागवत कथा श्रवणाचा लाभ सर्व भाविक भक्तांना मिळाला .यावेळी श्रीमद् भागवत कथा सोहळा आयोजन समितीच्या वतीने मा. श्री .विवेक भैय्या कोल्हे साहेब यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला .

यावेळी सर्व आयोजन समितीचे पदाधिकारी तळेगाव मळे पंचक्रोशीतील तसेच माहेगाव देशमुख येथील भाविक भक्त बहुसंख्येने उपस्थित होते .