छत्रपती संभाजी महाराज जयंती सालेकसा येथे साजरी…

धुर्व कुमार हुकरे

जमाकुडो प्रतिनिधी 

मो: 9404839323

स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सालेकसा येथे दिनांक 14 मे 2023 रोज रविवार ला कुणबी महासंघ तालुका सालेकसा व व्यापारी बहेकार कॉम्प्लेक्स सालेकसा च्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष आर जे कावडे सर यांनी फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केले. त्या प्रसंगी आर जे कवाडे यांनी मनोगत व्यक्त करताना संभाजी महाराज यांच्यावर थोडक्यात माहिती दिली.

छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राजाचे दुसरे छत्रपती व थोर कुर्तृत्ववान पुरुष होते. रणांगणावरील मोहिमा आणि डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहापणापासूनच मिळाले. संभाजीराजे हे अनेक भाषेत विदयाविशावरद व अत्यंत धुरंदर राजकारणीय होते.

ते सदैव प्रजेला मदत करणारे प्रजेच्या संरक्षण, पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारे राजे होते असे आपल्या मनोगतात सांगितले. जयंती प्रसंगी प्रमुख उपस्थिती ब्रजभूषण बैस, कैलास अग्रवाल, कुणबी महासंघ तालुका अध्यक्ष निलेश बोहरे, राकेश रोकडे, संघर्ष हुकरे, नरेंद्र नागपुरे, रवी चुटे, हरीश बहेकार, संतोष रघुवंशी, सुभाष हेमने, युवा कुणबी सेवा समिती अध्यक्ष दिशांत फुंडे, रामकृष्ण भाजीपले, बबलू शिवणकर, दीपक अग्रवाल, युराज ऊके, गणेश भोयर, भावेश जगणे, बहेकार भाऊ व समस्त बहेकार कॉम्प्लेक्स चे सर्व व्यापारी कार्यक्रमात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here