पर्यटकांच्या स्कुल बसला गाडी पुढे घ्या कार काढायची आहे असे सांगितल्याने डोक्यांत राग धरून स्कुल बस चालकाने कार चालकाला बेदम बदडले .
मारहाणीत कार चालक राहुल जैनला दुखापत
परस्परांवर गुन्हा दाखल .
✍️संतोष उद्धरकर✍️
म्हसळा तालुका प्रतिनिधी
📞७८७५८७१७७१📞
म्हसळा :- म्हसळा पोलीस स्टेशन पासून २० ते २५ पावलांवर असणाऱ्या शिवकृपा बँकेजवळ कार चालकाने कार समोर असणाऱ्या स्कुल बसला गाडी पुढे घ्या सांगितल्याने डोक्यांत राग धरून स्कुल बस चालक आणि सोबत असणाऱ्या ७ पर्यटकानी कार चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना सोमवार दि . १२/५/२४ रोजी सायंकाळी ६ वा घडली .
म्हसळा पोलीसानी गुन्हा रजी नं ४५ /२०२४ भा.द.वि . कलम १४३,१४७,१४९ ,३२३,५०४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(३)(१) प्रमाणे आरोपी १)व्यंकटेश राजकुमार घाटोळे रहाणार अनहार ता मोहोळ जि.सोलापूर अन्य ४ पुरुष आणि ३ महिला असे एकूण ८ आरोपीनी कार चालकाला लाथा बुक्क्यानी मारहाण केली.बस चालक आणि बस मधील पर्यटक हे शासकीय सेवेंत आसल्याचे समजते .फिर्यादी राहुल कातीलाल जैन वय २८ रा.साळीवाडा म्हसळा हे आपल्या ताब्यातील कार क्रं एम.एच.०४ जी. ई ६४६२ मधून आपली बहीण आणि अन्य नातलग असे जात असताना कार समोर असणाऱ्या स्कुल बस क्रं.एम.एच. १२ एच. बी.०७१० या बसचे चालकास कार पुढे करा मला जायचे आहे आशी विनंती केली असता स्कूल बस चालक आणि बस मधील अन्य ४ पुरुष आणि ३ महिलानी एकत्रितपणे बस हालविण्यास नकार दिला आणि संगनमताने राहुल याला शिविगाळ आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली . आशाच पद्धतीने स्कुल बसचा चालक राजकुमार यानी राहुल जैन आणि अन्य एक पुरुष आणि ४ महिला यांचे वर गुन्हा नोदविला आहे . दोन्हीही गुन्हे पो.हवालदार ब.नं८४७ संतोष चव्हाण यानी दाखल केला असून तपास पोसई पी.व्हि. एडवळे करीत आहेत . म्हसळा पोलीस स्टेशन मध्ये आधिकारी आणि कर्मचारी असे सुमारे ४३ कर्मचारी कार्यरत असताना पोलीस स्टेशन समोर स्कुल बस मधून पर्यटकांची वाहतुक करणाऱ्या बस चालकाने कार चालकाला केलेल्या मारहाणीचा म्हसळा शहरांत निषेध होत असून . सकाळी ८ ते सायंकाळी ८ या वेळेत पर्यटकांची आणि प्रवासी वाहने म्हसळा शहरांतून जावू न देण्याच्या धोरणात पोलीसानी का बदल केला आशीही चर्चा होत आहे .
यापुढे पर्यटकांची वाहने म्हसळा शहरातुन सोडु नये अशी म्हसळा शहर वासियांची प्रमुख मागणी आहे.