पूर्वा महेश पाटील चे यश

पूर्वा महेश पाटील चे यश

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९३

अलिबाग:- अलिबाग तालुक्यातील गाव डेविड इंग्लिश मीडियम स्कूल चोंढी मधील विद्यार्थी पूर्वा महेश पाटील हिने केंद्रीय शिक्षा बोर्डाच्या(CBC) दहावीच्या परीक्षेत 92 टक्के गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला .

डेव्हिड इंग्लिश मीडियम स्कूल चोंढी चानिकाल 98.90% लागला केंद्रीय शिक्षा बोर्ड (सीबीसी) दहावीच्या परीक्षेमध्ये नवखार येथील महेश आत्माराम पाटील यांची कन्या पूर्वा महेश पाटील हिने 92 टक्के गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला. त्याबद्दल तिचे शाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिला खामकर, वर्गशिक्षिका सरोज गावकर तसेच खारेपटातील उद्योगपती बबन पाटील यांनी तिथे अभिनंदन केले. पूर्वाच्या यशाबद्दल तिचे कौतुक केले जात आहे.