सलूनच्या दुकानात पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…महाड तालुक्यातील धक्कादायक घटना समोर…

सलूनच्या दुकानात पाच वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…महाड तालुक्यातील धक्कादायक घटना समोर…

✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞

रायगड :-महाड तालुक्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीत वाढ होताना दिसत आहे, नातीच्या वयाच्या मुलीला देखील नराधम वासनेचे शिकार बनवित आहेत अशा नराधमांना ताबडतोब फाशीची शिक्षा दिल्यास कुठेतरी अशा निच प्रवृत्तीच्या नराधमांना आळा बसेल, पाच वर्षांच्या चिमुकलीला खाऊला पैसे देतो असे आमिष दाखवून सलूनच्या दुकानात नराधम आरोपी बोलावून घेतो आणि आपली वासनेची भुक मिटवतो.. ज्यावेळी पिडीत मुलगी घडलेल्या् घटनेची माहिती आपल्या आईला सांगते त्यावेळी त्या मातेच्या हृदयाचे पाणी पाणी होऊन ती माऊली एकच हांबरडा फोडते. महाड तालुक्यातील ऐश्वर्या हेअर कटिंग सलून मध्ये हा घाणेरडा प्रकार घडला असून सलून चालविणारा विलास पांडुरंग हुलालकर .वय वर्षे अंदाजे ५० या आरोपीला पोलीसांनी अटक केले आहे,या गुन्हाचा तपास पोलीसांकडून कसोशीने सुरू असला तरी अशा नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे आरोपी विरोधात बलात्कार व पॉक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक व्हि. राऊत या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत…