प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी नवीन धोरण:विजय भाऊ वडेट्टीवार

49

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी नवीन धोरण:विजय भाऊ वडेट्टीवार

प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी नवीन धोरण:विजय भाऊ वडेट्टीवार
प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी नवीन धोरण:विजय भाऊ वडेट्टीवार

त्रिशा राऊत, चिमूर तालुका प्रतिनिधी
चिमूर :- प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी नवीन धोरण शासन तयार करीत आहे. लवकरच ते पुर्ण होऊन त्याचा लाभ संबंधितांना होईल. गोसीखुर्द प्रकल्पातील असलेले पुनर्वसनाचे प्रश्न पुढील काही काळामध्ये मार्गी काढण्यात येतील.

मदत व पुनर्वसन विभागाने ११६ नवीन मोठ्या बोटी खरेदी करण्याचे ठरविले असून त्याची प्रक्रिया पुर्ण होत आली आहे. त्यातून ४० बोटी विदर्भासाठी देण्यात येणार आहे. आपत्तीकाळात प्रशिक्षित टिम तालुकास्तरावर ठेवण्यात येणार आहे.

मागील वर्षी मध्यप्रदेशात मोठयाप्रमाणावर अतिवृष्टीमुळे पुर्व विदर्भात महापूर येवून वित्तीय व शेताचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे यावर्षी करावयाच्या उपाययोजना आणि दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी केल्या आहे.