एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातील संपूर्ण नाली सफाईची चौकशी करण्याची मागणी *मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन*

49

*एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातील संपूर्ण नाली सफाईची चौकशी करण्याची मागणी

*मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन*

एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातील संपूर्ण नाली सफाईची चौकशी करण्याची मागणी *मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन*
एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातील संपूर्ण नाली सफाईची चौकशी करण्याची मागणी
*मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन*

मारोती कांबळे
एटापल्ली तालुका प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज

एटापल्ली शहरातील नाली सफाईकडे नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर शासनाकडून वारंवार सुचना व मार्गदर्शन देऊन लोकांना स्वच्छता व आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हाहन केले जात आहे.मात्र एटापल्ली नगरपंचायतीला स्वच्छतेचा विसर पडला की काय,अशी गावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.
नगरपंचायत क्षेत्रातील अस्वच्छताने कळस गाठला आहे.
नाल्यांची सफाई होणे अपेक्षित असतांना बहुतांश नाल्या पाणी व कचऱ्याने तुडुंब भरल्या आहेत.त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
अशा गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करून त्यांचे जीव धोक्यात टाकणे होय.
एटापल्ली नगरपंचायत क्षेत्रातील मुख्य बाजारपेठ व सहयोगी गावातील रस्त्याच्या बाजूने असलेल्या नाल्यांची सफाई (उपसा) गेली.दीड वर्षांपासून करण्यात आली नाही.मात्र सदर कालावधीत नगरपंचायत प्रशासनाकडून कंत्राट मंजुरी करून बिल उचल केल्याची माहिती आहे.
जर अशी बोगस बिले काडून जनतेचा पैसा हडप केला असेल तर अशा प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
नगरपंचायत क्षेत्रातील नाली सफाई (उपसा) प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाही करण्याची मागणी श्री पुरुषोत्तम हीचामी श्री.रवीद्र हिराजी गावडे श्री सुरज लखमु गावडे श्री.सोहन टीकले सौ.वर्षा प्रकाश कुमरे सौ रमीला कुमरे श्री प्रकाश गावडे सौ शुलभा सडमेक उपस्थित होते