सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयाला तीन ऑक्सिजन कांसंट्रेटर भेट.

49

सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयाला तीन ऑक्सिजन कांसंट्रेटर भेट.

सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयाला तीन ऑक्सिजन कांसंट्रेटर भेट.
सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयाला तीन ऑक्सिजन कांसंट्रेटर भेट.

मुकेश शेंडे, तालुका प्रतिनिधी सिंदेवाही
सिंदेवाही :- ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे तीन ऑक्सिजन कांसंट्रेटर माजी आमदार अतुल भाऊ देशकर यांचे हस्ते भेट देण्यात आले. देशातील कोरोना जन्य परिस्थिती पाहता तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी भारतीय जनता पार्टी सरकारचा सात वर्षाचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण झाल्याबद्दल माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडून माननीय अतुल देशकर माजी आमदार यांचे प्रयत्नाने ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे तीन ऑक्सिजन कांसंट्रेटर भेट देण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी अतुलभाऊ देशकर माजी आमदार, नागराज भाऊ गेडाम जि.प. समाज कल्याण सभापती, जि. प. सदस्य संजय गजपूरे, मंदाताई बाळबुद्धे सभापती पंचायत समिती, मडावी माजी सभापती ,रितेश अलमस्त पंचायत समिती सदस्य , दिवाकर पुस्तोडे नगरसेवक , कमलाकर सिद्धमशेट्टीवार वरिष्ठ कार्यकर्ता, गोपीचंद गणवीर वरिष्ठ कार्यकर्ता व ग्रामीण रुग्णालयातील डॉ. झाडे साहेब व त्यांचे सहकारी डॉक्टर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी तसेच सिंदेवाही तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.