ठाण्यात रिक्षात बसुन असलेल्या महीलेचा मोबाईल हिसकावून दोघांचे पलायन.

✒अभिजीत सकपाळ, मुंबई प्रतिनिधी ✒
ठाणे,दि.15 जुन:- मुंबईच्या उपनगर ठाण्यातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मुंबईत आणि उपनगरात आज मोठ्या प्रमाणात चालत्या वाहनातून चोरीचे प्रकार वाढले आहे. त्यामुळे महिला आणि वृद्ध लोकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशीच एक घटना कळवा येथे रिक्षातून जाणाऱ्या एका 40 वर्षीय महीलेचा मोबाईल फोन दोन चोरट्यांनी हिसकावून पलायन केल्याची घटना खारेगाव येथे नुकतीच घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा सोमवारी दाखल झाला आहे.
खारेगाव येथे मुंबई नाशिक मार्गावरुन ही महिला 9 जून ला रोजी रिक्षाने जात होती. त्याचवेळी एका मोटारसायकलवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी त्यातील पाठीमागे बसलेल्या चोरटयाने चालत्या रिक्षामध्ये हात टाकून या महिलेच्या हातातील 90 हजारांचा मोबाईल जबरीने हिसकावून पलायन केले. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात 14 जून रोजी जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहिते हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.