स्वेच्छा रक्तदान शिबिरात झाला महारक्तदात्यांचा सन्मान, राजेंद्र गांधी व प्रकाश धारणे सन्मानित.

45

स्वेच्छा रक्तदान शिबिरात झाला महारक्तदात्यांचा सन्मान, राजेंद्र गांधी व प्रकाश धारणे सन्मानित.
आ सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराचा उपक्रम.

स्वेच्छा रक्तदान शिबिरात झाला महारक्तदात्यांचा सन्मान, राजेंद्र गांधी व प्रकाश धारणे सन्मानित.
स्वेच्छा रक्तदान शिबिरात झाला महारक्तदात्यांचा सन्मान, राजेंद्र गांधी व प्रकाश धारणे सन्मानित.

✍मनोज खोब्रागडे✍
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर :- येथील आय.एम.ए सभागृहात आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार परिवार तर्फे ३० मे पासून स्वेच्छा रक्तदान शिबिर सुरू असून सोमवार(१४जून)ला रक्तदानदिनाचे औचित्य साधून भाजपा महानगर महामंत्री राजेंद्र गांधी व कोषाध्यक्ष प्रकाश धारणे यांचा महारक्तदाता म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी भाजपा नेते प्रमोद कडू यांची अध्यक्ष म्हणून तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहुल पावडे भाजपा महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार, सचिव चंदन पाल, आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष धनराज कोवे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष धम्मप्रकाश भस्मे,महिला मोर्चा महामंत्री प्राचार्य प्रज्ञा गंधेवार,मुक्ती फाउंडेशन च्या अध्यक्ष मंजुश्री कासंगोट्टूवार, धनगर समाजचे नेते रामकुमार आकापेलिवार, शुभम शेंगमवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी राजेंद्र गांधी यांनी आतापर्यंत ७५ वेळा तर प्रकाश धारणे यांनी ५५ वेळा रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली म्हणून त्यांचा शाल, फेसशील्ड सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन प्रमोद कडू व सुभाष कासंगोट्टूवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमोद कडू म्हणाले, गांधी व धारणे यांनी केलेले रक्तदान प्रेरणादायी आहे. माणूस कर्माने मोठा होत असतो. भगवान बुद्धाची ही शिकवण समाजात रुजविली पाहिजे. जन्मजात कुणीच मोठा किंवा छोटा नसतो.त्याचे कर्म त्याला समाजात स्थान मिळवून देत असतात.सत्काराला उत्तर देताना प्रकाश धारणे म्हणाले,माझ्या निरोगी असण्याचे गणित रक्तदान आहे. रक्तदानामूळे शरीरात नवीन रक्तपेशी तयार होतात.शिवाय आजार बळावत नाही. प्रत्येकाने रक्तदान करून निरोगी राहिले पाहिजे.रक्तदानाची प्रेरणा आ.मुनगंटीवार यांचे कडून मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ गुलवाडे यांचे हस्ते रक्तदानसाठी युवकांना प्रेरित करणाऱ्या धनराज कोवे, मंजुश्री कासंगोट्टूवार, प्राचार्य प्रज्ञा गंधेवार,धम्मप्रकाश भस्मे यांना आ.सुधीर मुनगंटीवार यांचे तर्फे सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.राहुल पावडे यांचे हस्ते रक्तदात्यांचा आ. मुनगंटीवार यांचे तर्फे फेसशीइल्ड, सन्मान पत्र व रक्तदान प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

धम्मप्रकाश भस्मे यांनी रक्तदान करून स्वतःचा वाढदिवसा साजरा केला.यावेळी रोहित जोगराणा, सतीश तायडे, राकेश हनुमंते, निलेश हिवराळे, प्रेम चांदेकर यांनी स्वयंस्फूर्त रक्तदान केले. यावेळी राहुल पावडे, प्रज्ञा गंधेवार यांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले. सुभाष कासंगोट्टूवार यांनी आभार मानले. यावेळी मुक्ती फाउंडेशनच्या उपाध्यक्ष सुवर्णा लोखंडे, आशा देऊळकर व गीता गेडाम यांची उपस्थिती होती. डॉ कीर्ती साने यांचे देखरेखीत रक्त संकलन करण्यात आले.