अखेर पालकांचे खाते ग्राह्य उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार रक्कम

अखेर पालकांचे खाते ग्राह्य
उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार रक्कम

अखेर पालकांचे खाते ग्राह्य उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार रक्कम
अखेर पालकांचे खाते ग्राह्य
उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार रक्कम

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत उन्हाळी सुट्टीच्या कालावधीतील लाभ डी.बी.टी.द्वारे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरण करणेसाठी विद्यार्थ्यांची बॅंक खाती काढण्याच्या दृष्टीने येत असलेल्या अडचणी लक्षात घेता पालकांचे खाते ग्राह्य धरण्यात यावे.यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद( प्राथमिक)चे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी २८ जून २०२१ ला निवेदन पाठवून अपर मुख्य सचिव,शिक्षण आयुक्त,शिक्षण संचालक यांचे लक्ष वेधले होते.

निवेदनाची दखल घेत उन्हाळी सुट्टीच्या कालावधीतील लाभ डिबीटीद्वारे लाभार्थी यांना मिळणेसाठी आता पालकांचे खाते ग्राह्य धरण्यात येत असून आता पोस्टाचे खाते सुद्धा ग्राह्य धरण्यात येत
असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद( प्राथमिक)चे राज्य सहकार्यवाह प्रकाश चुनारकर यांनी म्हटले आहे.
केंद्र शासनाने कोविड-१९ विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत शालेय पोषण आहार योजनेंतर्गत सन २०२१ च्या उन्हाळी सुट्टीसाठी केवळ एक वेळ विशेष कल्याणकारी उपाय म्हणून सर्व पात्र विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेच्या आहार खर्चाच्या रकमेइतके आर्थिक साहाय्य थेट लाभ हस्तांतरण( डीबीटी)द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे ठरविले परंतु यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता नवीन परिपत्रक ९ जुलै २०२१ ला काढण्यात आलेले असून त्यात म्हटले आहे की ज्या मुलांची आधार नोंद आहे पण बॅंक खाते नाही ( उदा.१० वर्षांखालील मुले इ.) अशा विद्यार्थ्यांचा लाभ त्यांच्या पालकांच