यवतमाळ मध्ये कार व दुचाकीमध्ये भीषण अपघात, तिघा जनाचा जागीच मृत्यू.

साहिल महाजन✒
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
………
यवतमाळ,दि.15 जुलै:- यवतमाळ मधून कार आणि दुचाकीमध्ये एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, तिघा जनाचा जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे सर्वीकडे हयहय व्यक्त करण्यात येत आहे.

यवतमाळच्या नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आर्णी बायपास परिसरात कार आणि दुचाकीमध्ये एक भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरुन जाणाऱ्या तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. मृत तिघेही आर्णीहून यवतमाळच्या दिशेने निघाले होते. यावेळी समोरून येणाऱ्या कारने धडक दिल्यामुळे हा अपघात घडला.

प्राप्त माहितीनुसार, या भीषण अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वारांची नावं दीपक मेश्राम, नथ्थू कुंबरे आणि संदिप आत्राम अशी आहेत. अपघात झाल्या स्थिकानी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यवतमाळ जिल्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन मृत्यदेह उर्वरीत तपासनी साठी रुग्णालयात पाठवले.