*वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संगटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी प्राचार्य विनय चव्हाण यांची निवड*

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मीडिया वार्ता न्युज चंद्रपुर
मो 9764268694
एटापल्ली: वसंतराव नाईक, अधिकारी, कर्मचारी संगटनेच्या जिल्हा अध्यक्षपदी जिल्हा परिषद हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विनय चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राज्य संस्थापक अध्यक्ष अमर राठोड यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली. संगटनेचे सचिव वसंत पवार यांनी नाव सुचविले तर जिल्हा संघटक विष्णू चव्हाण यांनी अनुमोदन दिले. बैठकीला शहरातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.गडचिरोली जिल्ह्यात बंजारा समाजाचे मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग आहे.जिल्ह्यातील कर्मचारी, अधिकारी यांचे संघटन बळकट होण्यासाठी अधिक जोमाने काम करणार असे नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी बोलून दाखविले.समाजातील कर्मचाऱ्यांनी आपले सदस्य नोंदणी मोठया संख्येने करावे असे आव्हान केले.