संततधार पाऊसामुळे नुकसान झालेल्या घरांचे त्वरीत पंचनामे करा, भाजपा तालुका महामंत्री सतीश बोम्मावार यांची प्रशासनाकडे मागणी

बाबा मेश्राम

सावली तालुका प्रतिनिधि

मो: 7263907273

सावली : – सावली तालुक्यामध्ये गेल्या पाच दिवसापासून सतंधर पावसाने अक्षरशः हाहाकार माजविला आहे.तसेच गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदी पात्रात सोडल्याने नदी दुधळी भरून वाहत आहे व अनेक नाल्यांना पूर आला तर काही ठिकाणी घरात पाणी घुसलेले आहे.

या पावसाने सावली शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घरांची पडझड झाल्याचे दिसून येत आहे. सावली साज्यात 20 घरांची पडझड परंतु प्रशासनाकडून पाहिजे त्या पद्धतीने अद्याप ही त्यांच्या घरांचे पंचनामा केला नसल्याचे बाब उघडकीस आलेले आहे.कारण अनेक ठिकाणी थातुरमातुर पाहणी झाली मात्र योग्य पंचनामे न झाल्याची माहिती आहे.

त्यामुळे सावली शहरासह तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी घरांची पडझड झाली त्या सर्वांची त्वरित पंचनामे करावे व त्यांना आर्थिक मदत देण्यासाठी पुढील प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी भाजपा तालुका महामंत्री तथा नगरसेवक सतिश बोम्मावार यांनी सावली तालुका प्रशासनाकडे केलेली आहे. तसेच या संदर्भातून नगरसेवक सतीश बोम्मावार यांनी खासदार अशोक नेते यांच्याशी संपर्क साधून नुकसानीची माहिती दिलेली आहे.

 तालुक्यातील गेल्या सहा आठवडापासुन सुरू असलेल्या संततधार पावसाची सावली शहरात 112.20 मि मी .तर तालुक्यात 112 .50मि मी ची नोंद करण्यात आली.अनेक गावाचा पावसामुळे संपर्क तुटलेला आहे ,तर चारगाव भारपायली रस्ता बंद ,जिबगाव नाल्यावरुन पाणी जात असल्याने वाहतूक करु नये असे सांगितले जात आहे, याकडे प्रशासन सुध्दा पुर्ण तयारीनिशी सज्ज आहे, कुठे बारीकेट्स लावले आहे, पोलीस स्टेशन ,मंडळ आफिस, तहसील कार्यालयातुन पावसाची माहिती वेळोवेळी घेतली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here