वाघाच्या हल्ल्यात इसम ठार

अश्विन गोडबोले

चंद्रपूर महानगर प्रतिनिधी

मो: 8830857351

चिमूर, 15 जुलै:  ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या अलिझंजा जंगलात वाघाने केलेल्या हल्ल्यात सीताराम नन्नावरे ठार झाला. ही घटना शुक्रवारी घडली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या खडसंगी गावाजवळ बाह्मणगाव, टेकेपार व अलिझंजा या गावांना लागून जंगल असल्याने वाघाचा धुमाकूळ सुरु असतो.

गावकऱ्यांना शेतामध्ये, जळावू लाकडे गोळा करण्यासाठी व गुरे चारण्यासाठी जंगलात जावे लागते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या अलिझंजा जंगलात वाघाने केलेल्या हल्ल्यात सीताराम नन्नावरे हा गुराखी ठार झाला. तळोधी नाईक किटाळी गावालगत असलेल्या हेटी शिवार परिसरात वाघ दबा धरुन बसला होता. त्यातच सीताराम ननावरे हा आपले बैल चारत होता तेवढ्यात वाघाने ननावरे यांच्यावर हल्ल्ला चढवला त्यात ननावरे ठार झाले. सदर हल्यात ननावरे यांच्या एका बैलाची सुद्धा वाघाने शिकार केली तर दूसरा बैल जखमी झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here