प्राणहिता नदी काठावरील १८० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले

67

प्राणहिता नदी काठावरील १८० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले

महेश बुरमवार

मुलचेरा तालुका प्रतिनीधी

मो.न.9579059379

मुलचेरा: तालुक्यातील नदी काठावरील गावात सतंधर पाऊस व गोसेखुर्द धरणाच्या सोडलेल्या पाण्यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने काल प्राणहिता नदी काठावरील येल्ला , मरपल्ली,टिकेपल्ली गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

येल्ला येथिल लोकांना लगाम येथील बिर्ला मुंडा कनिष्ठ महाविद्यालय येथे हलविण्यात आले.व मरपल्ली, टिकेपल्ली येथील लोकांना गावातच जि.प.शाळेत हलविण्यात आले.प्रशासना कडून त्यांची जेवणाची व रहाण्याची सोय करण्यात आली. सकाळपासून पुर परिस्थितीत पाहता नदी काठावरील लोक जे पुरामुळे प्रभावित होतील अशा लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

यावेळी पुरपरिस्थीती चा आढावा घेण्यासाठी पोलिस उपविभागीय अधिकारी मा. अमोल ठाकुर ,मुलचेरा चे तहसीलदार मा. कपिल हटकर सर ,तालुका कृषी अधिकारी श्री. पाटील सर,संवर्ग विकास अधिकारी श्री. मनोहर रामटेके सर आदी उपस्थित होते.