महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ रामभरोसे – राजेश बेले, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर जिल्हा कार्यालयात अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता 

अश्विन गोडबोले

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

मो: 8830857351

चंद्रपूर,15 जुलै: चंद्रपूर जिल्हा हा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अतीप्रदूषित जिल्हा म्हणून जिल्ह्याची व चंद्रपूर शहराची ओळख आहे. जिल्ह्यात वाढत असलेल्या घातक प्रदूषणामुळे अनेक असाध्य आजार मानवासोबतच प्राणी, पक्षी वन्यप्राणी, जंगल, वायू, जल, मृदा एकंदरीतच संपूर्ण पर्यावरणाची मोठी हानी होऊन पर्यावरणातील जीवांसाठी घातक ठरत आहेत. 

अश्यातच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या चंद्रपूर जिल्हा कार्यालयात मनुष्यबळ (अधिकारी वर्गाची) कमतरता असल्यामुळे जिल्हयातील वाढते प्रदुषण लक्षात घेता तत्काळ येथे मनुष्यबळ व अधिकारी वर्गाची नेमणूक करण्यात यावी अन्यथा येत्या मंगळवार 18 जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र प्रदुषण मंडळ, चंद्रपूर कार्यालय परिसरात घंटा नाद आंदोलन करुन तिव्र निषेध करण्यात येईल. असा सूचक इशारा संजीवनी पर्यावरण व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी दिला आहे. राजेश बेले यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,अध्यक्ष, सदस्य सचिव, प्रादेशिक अधिकारी, उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी आदींना आंदोलनाची माहिती दिली.

 महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर या कार्यालया अंतर्गत येणारे जिल्हे चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली आदी आहेत. परंतू महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर या कार्यलयात फक्त एक उपप्रादेशिक अधिकाऱ्याच्या भरोश्यावर तीन जिल्ह्यांचा कार्यभार असल्यामुळे प्रदुषण ग्रस्त जिल्हयातील प्रदुषण कमी करण्याकरीता आवश्यक उपाय योजनेसाठी अतिरिक्त मुनष्यबळ आवश्यक आहे.

प्रदुषणाच्या टक्केवारीत चंद्रपूर जिल्हा देशात चौथ्या क्रमांकावर असून, महाराष्ट्रात आघाडीवर आहे. सोबतच यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यातही मोठया प्रमाणात प्रदूषणात लक्षणीय वाढ होेत आहे. गडचिरोली जिल्हयात लोह खनिज, आयर्न प्लॉन्ट, चुनखडी खानी, सिमेंट प्लॉन्ट इत्यादी प्रदूषणाला चालना देणारे उद्योग सुरु झाले आहे. याकरिता राज्यशासन, केंद्रशासन यांच्या निषेधार्थ तीव्र घंटा नाद आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती संजीवनी पर्यावरण व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here