शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिमलगट्टा येथे जिल्हा परिषद गट निहाय कार्यकर्ता संवाद मेळावा…

मारोती कांबळे

गडचीरोली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि

मो: ९४०५७२०५९३

दिनांक 14 जुलै रोजी अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा पेठां जिल्हा परिषद क्षेत्रातिल पदाधिकारी शिवसैनिक कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख श्री विनायक राऊत साहेब, पूर्व समन्वयक श्री प्रकाश वाघ साहेब,गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख श्री महेशजी केदारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गडचिरोली जिल्हा संघटक याच्या सहकार्याने जिल्हा प्रमुख रियाज शेख यांच्या अध्यक्षतेखाली व युवती जिल्हा अधिकारी तुळजा तलांडी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रमुख रियाज शेख यांनी संवाद साधताना *गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक प्रत्येक गावा गावत हा कार्यक्रम राबविण्यात येणार* असल्याचे सांगितले.

तसेच शासन आपल्या दारी असे कार्यक्रम आयोजित केला जात आहे परतू हा कार्यक्रम खोकला आहे केवळ कागदावरच सत्ताधारी सोंग करीत आहे फक्त जनतेला लालीपॉप देण्याचे काम केले जात आहे यासाठी सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक कमर कसून अश्या प्रत्येक घराघरात जाऊन शासनाची योजना लोकाना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा गोर गरीब शेतकरी मजुरांना बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कामाला लागा असे उद्देशून रियाज शेख यांनी सांगितले तसेच प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती विभागप्रमुख आणि उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख बूथ प्रमुख सर्कल प्रमुखांनी लोकांचे संपर्क साधावा मतदार यादी नुसार कार्य करावे आणि नवीन मतदारांची नोंदणी करावी समोर निवडणूक आयोगाने केव्हाही निवडणूक जाहीर करेल म्हणुन तयारी करावी. *सध्या राज्यात घाणेरडी राजकार सुरू आहे फोडाफोडीचे राजकारण होत असल्याने जनतेचा रोष अधिकच वाढून राहिला नक्कीच निवडणुकीत जनता यांना धडा शिकविणार* केवळ जनतेचा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्यावरच आहे पुन्हा उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होणार असे जिल्हा प्रमुख. रियाज शेख यांनी या वेळी आपल्या मार्गदर्शनात सांगितले विशेष गडचिरोली जिल्ह्यासाठी आपल्याला दमदार आणि अनुभवी महेशजी केदारी साहेब संपर्क प्रमुख लाभले याचा फायदा नक्कीच जिल्ह्याला होईल.

प्रास्ताविक जाहीर शेख यांनी केले यावेळी सर्कल प्रमुख, मदन गावडे, संतोष आत्राम विभाग प्रमुख, वसंत कन्नाके उपविभाग प्रमुख, अनिल आत्राम उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख जाहीर शेख, उपशाखा प्रमुख नागेश उपला,युवती सेना विभागप्रमुख श्रीमंती मिसाळ, प्रियंका वेलादि उपविभाग प्रमुख, अचल कुसराम ,युवा सेना विभागप्रमुख आकाश naitam, शाखाप्रमुख संदीप आत्राम, उपशाखा प्रमुख निसार शेख, उपविभाग प्रमुख दिपक तोरिम,अश्विनी आत्राम महिला आघाडी शाखा अधिकारी, रणजीता ताई उपशाखा अधिकारी यावेळी असंख्य पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here