पोलादपूर तालुक्यातील 42 ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर; 21 ग्रामपंचायतींवर महिला राज

पोलादपूर तालुक्यातील 42 ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर; 21 ग्रामपंचायतींवर महिला राज

सिद्धेश पवार
तालुका प्रतिनिधी पोलादपूर
8482851532

पोलादपूर :- पोलादपूर पोलादपूर तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी सन 2025-2030 या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंच पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून, यामध्ये 42 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 21 ग्रामपंचायती महिला उमेदवारांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात संधी मिळणार असून, महिलांच्या मूलभूत प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम होण्याची आशा निर्माण झाली आहे.

आरक्षण जाहीर करण्यासाठी पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीत प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार कपिल घोरपडे, गटविकास अधिकारी दीप्ती गाट, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते. या वेळी अधिकृतपणे आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली.

आरक्षणाचे तपशील पुढीलप्रमाणे:

अनुसूचित जाती (SC):

खुला: 1 ग्रामपंचायत

महिला: 2 ग्रामपंचायती

अनुसूचित जमाती (ST):

खुला: 2 ग्रामपंचायती

महिला: 1 ग्रामपंचायत

नागरिकांचा मागासवर्ग (OBC):

खुला: 5 ग्रामपंचायती

महिला: 6 ग्रामपंचायती

सर्वसाधारण वर्ग (Open):

खुला: 13 ग्रामपंचायती

महिला: 12 ग्रामपंचायती

 

अनुसूचित जमाती आरक्षण:

खुला वर्ग: कापडे बुद्रुक, भोगाव खुर्द

महिला वर्ग: देवपूर

अनुसूचित जाती आरक्षण:

महिला वर्ग: कापडे खुर्द, महाळुंगे

खुला वर्ग: माटवण

मागासवर्ग आरक्षण (OBC):

महिला वर्ग: धामणदिवि, गोळेगणी, तुर्भे खुर्द, वझरवाडी, काळेवाडी, काटेतळी

खुला वर्ग: अडावळे बु., तुर्भे खोडा, पैठण बोरावळे, परसुळे

सर्वसाधारण आरक्षण:

महिला वर्ग: धारवली, पार्ले, पांगळोली, वाकण, दिविल, चरई, मोरसडे, सवाद, कुडपण बु., चांभार गणी, लोहारे, कोतवाल खुर्द

खुला वर्ग: बोरघर, बोरज, उमरठ, मोर्गिरी, देवळे, कोंढवी, तुर्भे बु., महालगुर, गोवेळे, कोतवाल बु., ओंबळी, सडवली, पळचिल

या आरक्षणातून स्पष्ट होते की, तालुक्यातील महिलांना स्थानिक प्रशासनात भाग घेण्याची मोठी संधी मिळणार असून, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वपूर्ण आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे गावांमध्ये महिला नेतृत्वाचे नवे पर्व सुरू होणार आहे.