भीम आर्मी जळगाव शहर अध्यक्षपदी राजभाऊ सुरवाडे यांची निवड

60

भीम आर्मी जळगाव शहर अध्यक्षपदी राजभाऊ सुरवाडे यांची निवड

भीम आर्मी जळगाव शहर अध्यक्षपदी राजभाऊ सुरवाडे यांची निवड
भीम आर्मी जळगाव शहर अध्यक्षपदी राजभाऊ सुरवाडे यांची निवड

 

                         मिडिया वार्ता न्यूज

                  जळगाव जिल्हा प्रतिनिधी

                     ✒ विशाल सुरवाडे ✒

 

जळगाव-आज दिनांक- 15 ऑगस्ट 2021 रोजी राज मालती नगर येथील नालंदा बुद्ध विहार येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महापुरुषांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्याचबरोबर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

त्यावेळेस भीम आर्मी जळगाव जिल्ह्यात युनिटचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच त्यावेळी भीम आर्मी महाराष्ट्र राज्य प्रवक्ता रमाकांत जी तायडे व भीम आर्मी जळगाव जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ सपकाळे यांनी भीम आर्मी जळगाव शहर अध्यक्षपदी राजभाऊ सुरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्याच बरोबर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक भीम आर्मी राज्य सचिव सुपडू संदांशिव यांनी केले.

त्याच बरोबर भीम आर्मी महाराष्ट्र राज्य प्रवक्ता रमाकांत जी तायडे, जळगाव जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ सपकाळे, जिल्हा महासचिव श्रीकांत वानखेडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच जमलेल्या सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

त्यावेळेस भीम आर्मी राज्य प्रवक्ता रमाकांत जी तायडे, जळगाव जिल्हा अध्यक्ष गणेश भाऊ सपकाळे, जिल्हा सचिव श्रीकांत वानखेडे, राज्य सचिव सुपडू संदांशिव, जिल्हा संघटक डोली वानखेडे, जिल्हा संघटक योगेश भालेराव, भुसावळ तालुका अध्यक्ष विकास वलकर, भुसावल कार्याध्यक्ष महेश सपकाळे, राजेश सकट, मुकेश कांबळे, राहुल गजरे, वंचित बहुजन आघाडी जिल्हा संपर्कप्रमुख आधार कांबळे, सामाजिक कार्यकर्ता अजय गरुड, विकी सोनवणे, राहुल लोखंडे, निलेश इंगळे, अमर गायकवाड, सिद्धार्थ वानखेडे, गौतम बिराडे, दर्शन सुरवाडे, विलास ब्राह्मणे, मंगेश काजवे, गोपाल महाले, अमोल मोरे,शुभम बनसोडे, जगदीश उमरे, ईश्वर अहिरे, राहुल इंगळे, भोला वाघ, विकी माने, सचिन सोनवणे, मुकेश सुरडकर, सुमित वाघ, सागर सोनवणे, सत्यम सोनवणे, जयराज भारुडे, प्रेम सुरवाडे, सोन्या कोळी,साजिद पिंजारी, सुर्यकांत अहिरे,अंकुश सुरवाडे, सौरभ वाघ, उदय वाघ,विकी अडकमोल, गौतम गुलाल, स्वप्नील बाविस्कर, आकाश वाघ, संतोष वाघ, कृष्णा महाले व इतर कार्यकर्ते उपस्थित होते