दहशतवाद्यांच्या हिटलिस्टमध्ये नागपूर; ‘हाय अलर्ट’, कडक बंदोबस्त*

*दहशतवाद्यांच्या हिटलिस्टमध्ये नागपूर; ‘हाय अलर्ट’, कडक बंदोबस्त*

दहशतवाद्यांच्या हिटलिस्टमध्ये नागपूर; ‘हाय अलर्ट’, कडक बंदोबस्त*
दहशतवाद्यांच्या हिटलिस्टमध्ये नागपूर; ‘हाय अलर्ट’, कडक बंदोबस्त*

त्रिशा राऊत
चिमूर तालुका प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mo 9096817953

नागपूर : दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असलेल्या देशातील ‘टॉप १०’ शहरामध्ये नागपूर शहराचा समावेश असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने (इंटलिजन्स ब्युरो) दिला होता. हा इशारा लक्षात घेता पोलिस विभाग सतर्क झाला आहे. त्यामुळे शहरात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्या दृष्टीने शहरात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येपासून शहरातील ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या दोन दिवसांपूर्वी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यात इशारा लक्षात घेता बंदोबस्ताचे सुक्ष्म नियोजन केले आहे. त्यामुळे शनिवारपासूनच संवेदनशील भागांसह उपराजधानीला सशस्त्र पोलिसांचा वेढा घालण्यात आला. शहरात दोन हजारांपेक्षा अधिक सशस्त्र पोलिस तैनात केले आहेत.