धुळे जिल्हात 15 ऑगस्ट पासून सर्व व्यापारी दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार

धुळे जिल्हात 15 ऑगस्ट पासून सर्व व्यापारी दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार

धुळे जिल्हात 15 ऑगस्ट पासून सर्व व्यापारी दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार.
धुळे जिल्हात 15 ऑगस्ट पासून सर्व व्यापारी दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार.

नामदेव धनगर✒
धुळे प्रतिनिधी
9623754549
धुळे,दि.14 ऑगस्ट:- धुळे जिल्हासह संपुर्ण महाराष्ट्रात कोरोना वायरसच्या प्रादुर्भावाने हाहाकार माजवला होता. पण आता संसर्गाचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे धुळे जिल्ह्यातील सर्व व्यापारी दुकाने 15 ऑगस्टपासून सर्व दिवस रात्री 9 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. मात्र, दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवसांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.

कोरोना विषाणूमुळे उदभवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालिन परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यासाठी विविध उपाययोजनांची केल्या जात आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाकडील 2 ऑगस्ट रोजी सुधारित निर्देश पारित केले आहे. त्याअनुषंगाने

उपहारगृहे : खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने पुढील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरू करण्याची मुभा देण्यात येत आहे. उपहारगृहे, बारमध्ये प्रवेश करताना, प्रतीक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहील. याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहील. उपहारगृह/बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहील व ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहेत असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह/बारमध्ये काम करु शकतील. उपहारगृह/बारमध्ये विहीत शारीरिक अंतराचे पालन करावे.
उपहारगृह/बारमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच सॅनेटायझरची व्यवस्था तसेच उपहारगृहे/बार सुरु ठेवण्यास सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत मुभा देण्यात येत आहे. तसेच जेवण 9 वाजेपर्यंत घ्यावी. मात्र, पार्सल सेवा 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.

दुकाने : जिल्ह्यातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.

शॉपिंग मॉल्स : जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.

जिम्नॅशिअम, योग सेंटर, सलून-स्पा : वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम, योग सेंटर, सलून-स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. मात्र, या संस्था वातानुकुलित असल्यास वायूविजनासाठी फॅन व वातानुकुलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील.

इनडोअर स्पोर्टस : या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायूविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील. या ठिकाणी खेळाडूंना बॅडमिंटन, टेबल- टेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मल्लखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.

कार्यालय/औद्योगिक/सेवाविषयक आस्थापना : सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापनाचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पूर्ण करावे.
खासगी कार्यालय- वेळेच्या व्यवस्थापनासाठी कार्यालये 24 तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. मात्र, अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या 25 टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील.

जिल्ह्यातील सर्व मैदाने, उद्याने, चौपाट्या स्थानिक प्राधिकरणाने विहित केल्यानुसार रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहतील.

विवाह सोहळे : खुल्या प्रांगणातील, लॉनवरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण, लॉन, मंगल कार्यालय/हॉटेल मधील आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.

खुल्या प्रांगण/लॉन मध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यास उपस्थितांची प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्या 50 टक्के परंतू जास्तीत जास्त 200 व्यक्ती या मर्यादेत राहील. बंदिस्त मंगल कार्यालय/हॉटेलमध्ये उपस्थितांची संख्या क्षमतेच्या 50 टक्के परंतु जास्तीत जास्त 100 व्यक्ती या मर्यादेत राहील. निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तसेच संबंधित हॉटेल/कार्यालयांवर दंडनीय कारवाई तसेच संबंधित हॉटेल/मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

सिनेमागृहे व मल्टिप्लेक्स : जिल्ह्यातील सर्व सिनेमागृह/नाट्यगृह, मल्टिप्लेक्स (स्वतंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

धार्मिक स्थळे : जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील.

आंतरराज्य प्रवास : ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरिकांना, बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेशासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशांसाठी 72 तास पूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह किंवा 14 दिवस विलगीकरण आवश्यक राहील.

गर्दी/जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणुका, प्रचार, सभा, रॅली, मोर्चे इ. वरील निर्बंध कायम राहतील.

आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई- फौजदारी कारवाईस पात्र राहील. सदरचा आदेश 15 ऑगस्ट 2021 पासून अमलात येईल, असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे.