अहेरीच्या प्रभुसदन कॉलनीत ध्वजारोहण. शाहीन भाभी हकीम यांच्या शुभहस्ते तिरंगा फडकविण्यात आले.

अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335
अहेरी:- येथील प्रभुसदन कॉलनीत 15 आगष्ट स्वातंत्र्य दिनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम यांच्या शुभहस्ते तिरंगा ध्वज फडकविण्यात आले.त्यानंतर ध्वजला सलामी व सामूहिकरीत्या राष्ट्रगीत सादर करण्यात आले.
यावेळी प्रामुख्याने माजी नगरसेवक शैलेश पटवर्धन, सारिका गडपल्लीवार, ममता पटवर्धन, मुक्तदिर शेख, लीला वेलादी आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी शाहीन भाभी हकीम यांनी, भारतीय स्वातंत्र्यासाठी थोर महापुरुषांनी आपले सर्वस्वी अर्पण करून देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी क्रांतिकारक वीर जवानांनी व थोर महापुरुषांनी प्राणाची आहुती दिले.इतिहास न विसरता प्रत्येकांनी थोर महापुरुषांचे प्रेरणा व आदर्श नजरेसमोर ठेऊन देशहितासाठी कार्य करावे असे म्हणत वेगवेगळ्या उदाहरणासहित थोर महापुरुषांचे व देश स्वातंत्र्याचे महत्त्व शाहीन भाभी हकीम यांनी यावेळी पटवून दिले.
तसेच यावेळी शाहीन भाभी हकीम यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभपर्वावर अंगणवाडी व शालेय बालकांना चॉकलेट व बिस्कीट वितरित करून बालकांचे कौतुकही केले. यावेळी रैनू पुंगाटी, सुरेश मडावी, राजू मडावी, मायकल मिन्स, मदन्ना आत्राम, जॉन मिन्स, दिवाकर वेलादी, विभूती, महेश मडावी, लक्ष्मी मडावी आदी व प्रभूसदन वॉर्डवासीय उपस्थित होते.