गोंडपिपरी, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना खावटी योजनेतून जाणीवपूर्वक डावलले :ग्रामस्थांचा आरोप

गोंडपिपरी, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना खावटी योजनेतून जाणीवपूर्वक डावलले :ग्रामस्थांचा आरोप

गोंडपिपरी, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना खावटी योजनेतून जाणीवपूर्वक डावलले :ग्रामस्थांचा आरोप
गोंडपिपरी, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना खावटी योजनेतून जाणीवपूर्वक डावलले :ग्रामस्थांचा आरोप

राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी,दि.15 ऑगस्ट:- सविस्तर वृत्त असे की खावटी योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना खावटी किटचे वाटप नुकतेच करण्यात आले. मात्र या योजनेतून योग्य व पात्र लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा आरोप गोंडपिपरी तालुक्यांतील गोजोली येथील ग्रामस्थांनी करीत प्रकल्प अधिकारी चंद्रपूर यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

कोरोना संकटकाळात अनेकांचे रोजगार बुडाले. हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची संख्या तालुक्यात अधिक असल्याने अनेकांवर उपासमारीची पाळी आली.अनुसूचित जमातीच्या कुटुंबियांसमोर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला. आणि उपासमारीची वेळ येऊन ठेपली. अशा परिस्थितीत शासनाकडून बंद करण्यात आलेली खावटी योजना पुन्हा राबविण्यात आली. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना २ हजार रुपये बँक खात्यात तर २ हजार रुपये किंमतीचे वस्तू स्वरूपात कीटचे वाटप करण्याचे मंत्रिमंडळात मंजूर झाले.

सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शोधून त्यांचे अर्ज भरून घेण्याचे काम श्रीराम आदिवासी आश्रम शाळा गोजोली येथील शिक्षिका बि. एस.शेंडे यांच्याकडे सोपविण्यात आले. यात दोन ग्रामपंचायती अंतर्गत येत असलेल्या गोजोली, चेक गोजोली,दुबारपेठ, चीवंडा या चार गावांचा समावेश होता. सदर शिक्षिकेने अर्ज भरुन घेताना गोजोली येथील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना जाणीवपूर्वक डावलण्याचे काम केले. या योजनेअंतर्गत कुठलेही निकष व कागदपत्रांची पूर्तता न करता, प्रत्यक्ष कुटुंबांना भेट न देता, एकाच ठिकाणी बसून आपसी व संबंधातील व्यक्तींचे अर्ज भरून स्वीकृत केले. व काही आदिवासी जमातीतील लोकांचे अर्ज न भरता टाळाटाळ करण्यात आली. यामुळे गावात अनेक पात्र लाभार्थी असून सुद्धा लाभापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी प्रकल्प अधिकारी चंद्रपूर यांना दिलेल्या तक्रार अर्जातून केला आहे. सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून पात्र आदिवासी जमातीतील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात यावा व चौकशीअंती सदर शिक्षिकेवर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

सदर योजनेअंतर्गत अर्ज भरण्याचे काम माझ्याकडे सोपविण्यात आले होते. या योजनेतील अटी व शर्तीच्या अधिनस्त राहून अर्ज भरून घेतले आहे. जे कुटुंब या योजनेच्या निकषात बसले नाही, किंवा कागदपत्रांची पूर्तता केले नाही तेच कुटुंब या योजनेपासून वंचित राहिले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी लावलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत.
बि.एस.शेंडे, शिक्षीका, श्रीराम आदिवासी आश्रम शाळा गोजोली

या योजनेअंतर्गत विधवा, घटस्पोटीत, परितक्त्या अशा महिलांना प्रथम प्राधान्य देण्यात यायला हवे असताना यांना जाणीवपूर्वक वगळण्यात आले आहे. काही अविवाहित लोकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे अर्ज भरताना शिक्षिकेने भेदभाव केला आहे. 

संतोष कळते, वंचीत लाभार्थी गोजोली,