*गोसेखुर्द च्या कालव्यात बुडून दोघांचा मृत्यु*
*असोलामेंढा तलाव क्षेत्रातील कालव्यात पोहायला जाणे बेतले जिवावर*

*असोलामेंढा तलाव क्षेत्रातील कालव्यात पोहायला जाणे बेतले जिवावर*
राजू ( राजेंद्र ) झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
पोलीस स्टेशन पाथरी जवळील आसोलामेंढा ते व्याहाड कडे जाणारा गोसेखुर्द कालव्याच्या मध्ये दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 15 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे.
पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या या क्षेत्रात असोलामेंढा तलाव तसेच कालव्यात पोहण्यास बंदी आहे. त्या दृष्टीने पाथरी चे ठाणेदार बन्सोड यांनी सुरक्षा ही लावली मात्र तरीही सुरज नेवारे व सोनु सोरते ह्या युवकांनी सुरक्षा व्यवस्थेला चकमा देत पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज आला नसल्याने सोनु सोरेते पाण्यात बुडू लागला. त्याला वाचविण्याच्या नादात सुरज नेवारे देखिल खोल पाण्यात गेला व तोसुद्धा पाण्यात बुडला.
घटनेची माहिती मिळताच पाथरीचे ठाणेदार बनसोड ह्यांनी आपल्या चमूसह घटनास्थळी धाव घेतली. बराच वेळ शोध घेऊन अखेर दोघांनाही पाण्याबाहेर काढण्यात त्यांना यश आले. दोघांनाही प्राथमिक स्वास्थ केंद्र पाथरी येथे नेण्यात आले. त्यावेळी मात्र तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.
दोन्ही मृतकांची ओळख पटवण्यात आली असून सुरज नानाजी नेवारे, वय 21 वर्ष, रा. पाथरी व सोनू पितांबर सोरते, वय 25 वर्ष, रा. बामणी, जि. गडचिरोली असे त्यांचे नाव आहे. पाथरी पोलिसांनी घटनेचा मर्ग क्र.12/2021 दाखल करून शव विच्छेदन करण्याकरिता पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.