जागतिक स्तरावरील कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन, ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 15 ऑगस्ट

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
वर्धा, 15:- जागतिक स्तरावर आयोजित होणाऱ्या सन 2021-22 या वर्षातील कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी kaushalya.mahaswayam.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी किंवा गूगल लिंक https//docs.google.com/form/d/e/lFlQLScc9hv8zb9elBlBPWfEYnyXK0485eibd8vzLbX24LphXPQDw/viewform या लिंक वर अर्ज सादर करावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास व उद्योजगता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.
ही स्पर्धा जिल्हा, विभाग, राज्य, आणि देश पातळीवर होणार आहे. देशपातळीवर उत्कृष्ट कौशल्य दाखविलेल्या उमेदवारांची निवड जागतिक स्पर्धेसाठी होईल. यासाठी संबंधित जिल्हा व राज्यस्तरावर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, सेक्टर स्किल कौन्सिल, विविध औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा आयोजित करण्याबाबत राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC National Sill Development Council ) मार्फत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. ही स्पर्धेत विविध 48 क्षेत्रातील कौशल्याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन 17 व 18 ऑगस्ट या कालावधीत संबंधित जिल्हयातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच तांत्रिक विद्यालयाच्या ठिकाणी आयोजित करण्यात येईल. जिल्हास्तरावर निवड झालेल्या उमेदवारांसाठी विभागीय स्तरावरील स्पर्धा 23 व 24 ऑगस्ट 2021 रोजी आयोजित केली आहे. तसेच पुढे नामांकन झालेल्या उमेदवारांची राज्य स्तरावरील स्पर्धा 3,4 व 5 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
वर्धा जिल्हयातील जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे या उद्देशाने 15 ऑगस्ट 2021 पर्यंत नोंदणी करिता गूगल लिंक https//docs.google.com/form/d/e/lFlQLScc9hv8zb9elBlBPWfEYnyXK0485eibd8vzLbX24LphXPQDw/viewform सुरू केली आहे. किंवा इच्छूक उमेदवारांनी Kaushalya.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास व उद्योजगता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैयाजी येरमे यांनी केले आहे.