सातारा हुंबरळी येथे भुस्खलन होऊन डोंगर खाली आल्याने आनंद देसाई यांचं घर पडून माता मृत्यू पावली.

✒गुणवंत कांबळे✒
मुंबई प्रतिनिधी
9869860530
सातारा,दि.15 ऑगस्ट:- कोयनानगर तालुका पाटण जिल्हा सातारा हुंबरळी येथे भुस्खलन होऊन डोंगर खाली आल्याने आनंद देसाई यांचं घर पडून एक माता मृत्यू पावली आहे. आनंद देसाई यांची आई, विजया देसाई या मृत्यू पावल्या आणि संगीता उत्तम कांबळे यांचे देखील घर पूर्ण जमीन दोस्त झाले आणि त्यांची दोन मुले.प्रणव उत्तम कांबळे आणि प्रन्या उत्तम कांबळे हे दोघे बहीण भाऊ गंभीर जखमी झाले आसून ते कराड कृष्णाचारी हॉस्पिटल मधे उपचार घेत आहेत.
अचानक झालेल्या या अतिवृष्टीने बौद्ध वस्तीच्या मागचा डोंगर खाली आला. आणि हा भयानक प्रकार घडला.यामधे गावातील शेत जमिनीचे माती, गाळ येऊन प्रचंड नुकसान गावातील ग्रामस्थांची शेतीची प्रचंड नुकसान झाले.सर्वांमध्ये भीती निर्माण झाली. सदर बौद्ध वस्ती मध्ये सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना तात्पुरते पर्यायी म्हणून गावच्या ग्रामस्थांनी पर्यटन केंद्रातील वाजी या असणाऱ्या रिसॉर्टमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. भयभीत असलेले लोक आज या ठिकाणी राहत आहेत. पुढील शासनाच्या तरतुदीची लोक वाट पाहत आहेत.आपलं युट्युब चॅनेल विजय कांबळे यांच्या माध्यमातूनही माहिती मिळाली.