मिडिया वार्ता न्यूज हिंगणघाट तर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

प्रशांत जगताप, प्रतिनिधि
9766445348
हिंगणघाट,दि.15 ऑगस्ट:- 15 ऑगस्ट 1947 ला भारत देशाला गुलामगिरीतून मुक्ती मिळाली. या दिवसाच्या स्मरणार्थ, दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी भारत देश आपला 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे.
मिडिया वार्ता न्यूजचे उप संपादक श्री. मुकेशजी चौधरी, कार्यकारी संपादक प्रशांत जगताप, वर्धा जिल्हा प्रतिनिधी आशिष अंबादे, वर्धा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी प्रा. अक्षय पेटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मिडिया वार्ता न्यूज तर्फे विविध उपक्रम राबवुन 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोर गरीब विध्यार्थी मित्रांना शैक्षणिक साहित्य, लहान मुलांना बिस्किट, चॉकलेट, चीप, मिठाई वाटप करण्यात आले.