राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांचा नागपूर दौरा

✒युवराज मेश्राम✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
9527526914
नागपूर, दि.15 :- राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी हे नागपूर दौ-यावर येत आहेत.
सोमवार दि. 16 ऑगस्ट रोजी रात्री 8.40 मि. वाजता विमानाने त्यांचे आगमन होईल व मुक्काम.17 ऑगस्ट रोजी अनुसूचित जातीच्या आढावा बैठकीला उपस्थित राहतील. त्यानंतर रवि भवनला मुक्काम. 18 ऑगस्ट रोजी स्वयंसेवी संघटनाच्या बैठकीला उपस्थित राहतील. 19 ऑगस्ट रोजी अनुसूचित जातींबाबत निवेदन व चर्चा करतील. 20 ऑगस्ट रोजी अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या संघटनांसोबत बैठक. 21 ऑगस्ट रोजी सामाजिक उपक्रमांना उपस्थित राहतील व 22 ऑगस्ट रोजी रात्री 9.15 मिनिटांनी दिल्लीकडे प्रयाण करतील.