सांगलीत थरकाप उडवणारी घटना, दारु पिताना शिवीगाळ केली म्हणुन मित्राची हत्या करुन शरीराचे तुकडे टाकले कूपनलिकेत.

संजय कांबळे✒
सांगली जिल्हा प्रतिनिधी
989009362

सांगली,दि.14 ऑगस्ट:- सांगली जिल्हातुन एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मित्राची हत्या केल्यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे करुन कूपनलिकेत टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दारु पिताना शिवीगाळ केल्याच्या रागातून दोघांनी मित्राची हत्या केल्याचा आरोप आहे. सांगली जिल्ह्यात क्रौर्याची परिसीमा गाठणारा हा प्रकार घडला.

24 वर्षांचा दत्तात्रय शामराव झांबरे हा तरुण 28 जुलैपासून बेपत्ता होता. जवळपास दोन आठवड्यांनी त्याच्या बेपत्ता होण्याचे गूढ उकलले आहे. अमोल ऊर्फ धर्मराज आनंदा खामकर वय 27 वर्ष आणि सागर सुरेश सावंत वय 25 वर्ष या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील भोसे गावामध्ये हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार घडला.

दत्तात्रय झांबरे 28 जुलैपासून बेपत्ता होता. दत्तात्रय हा अमोल आणि सागर या दोघांसोबत मद्यपान करत असताना शिवीगाळ करण्यावरुन तिघांमध्ये खटके उडाले. या रागातून अमोल आणि सागर या दोघांनी त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. इतक्यावर न थांबता आरोपींनी दत्तात्रयच्या शरीराचे तुकडे केले आणि कूपनलिकेत टाकले. दत्तात्रयच्या खून प्रकरणी अमोल खामकर आणि सागर सावंत या दोघांनी कबुली दिली असून मिरज ग्रामीण पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.