सोलपुरात सासऱ्याने केला सुनेचा विनयभंग, गुन्हा दाखल.

सोलपुरात सासऱ्याने केला सुनेचा विनयभंग, गुन्हा दाखल.

सोलपुरात सासऱ्याने केला सुनेचा विनयभंग, गुन्हा दाखल.
सोलपुरात सासऱ्याने केला सुनेचा विनयभंग, गुन्हा दाखल.

प्रवीण वाघमारे✒
सोलापूर प्रतिनिधी
9923456641

सोलापूर,दि.14 ऑगस्ट:- सोलापुर मधून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. घरात कोणी नसताना सासऱ्याने सुनेचा हात पकडत तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सासऱ्यावर व सासू, दीर आणि पतीवर हुंडा मागत छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडित सुनेने गुरुवारी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिलेचा आरोपी पतीसोबत काही महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्यानंतर पती, सासू, दीर यांनी माहेरून पैसे घेऊन येण्यासाठी तिला शिवीगाळ करत तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच घरात कोणी नसताना आरोपी सासऱ्याने फिर्यादी सुनेचा हात धरून, तिला जवळ ओढत तिच्याशी झोंबाझोंबी केली. पीडित सुनेने आरडा ओरड केल्यानंतर सासरा निघून गेला. त्यानंतरही अनेक वेळा आरोपी सासऱ्याने असे कृत्य केले. उर्वरित आरोपींनी तिचा मानसिक छळ केला. अशा आशयाची फिर्याद पीडित महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून घटनेचा तपास पोलीस करत आहेत.