न्यू इंग्लिश हाय स्कूल चणेरे विद्यालयात आज 15ऑगस्ट 2022रोजी भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 🇮🇳
शहानवाज मुकादम
रोहा शहर प्रतिनिधी
मो.7972420502
रोहा: न्यु इंग्लिश हाय स्कूल चणेरे विद्यालयात आज 15 ऑगस्त 2022 रोजी भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला,
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे चणेरे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मा. श्री. प्रसन्ना सिनकर यांचे हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. प्रमुख मान्यवर मा. रामचंद्र सकपाळ यांचे हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले व विद्यालयाचे कार्यकुशल मुख्याध्यापक आदरणीय श्री. शिवाजी जोंधळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.*
सदर कार्यक्रमाप्रसंगी चणेरे गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक, महिला,स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य गण, माता-पालक संघ व सदस्य, शाळेचे माजी विद्यार्थी, शासकीय अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी, शिक्षणप्रेमी, शाळेचे हितचिंतक, विद्यालयातील सर्व गुरुजन वर्ग, भारताचे भावी आधारस्थंभ अर्थात विद्यालयातील सर्व विद्यार्थी -विद्यार्थिनी व मान्यवर उपस्थित होते.*
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. टारपे गोपाळ व श्री. नांगरे गणेश यांनी केले. सदर प्रसंगी विद्यालयातील एन. एन.सी. सी. ग्रुप पथकाने उपस्थित मान्यवर व राष्ट्रध्वजाला सलामी देऊन संपन्न झाला.