महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

विशाल सुरवाडे

जळगाव ब्युरो चीफ

मो: 9595329191

जळगाव- दि-15 ऑगस्ट दि पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, प्रेमनगर, जळगाव व स्व.शेठ बी.एम. जैन प्राथमिक विद्यालय या दोन्ही विद्यालयाचा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्था सदस्य श्री.डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीताने तिरंगा झेंड्यास सलामी देण्यात आली. यावेळी विद्यालयाच्या शालेय समिती सदस्या सौ.साधना शर्मा, मुख्याध्यापक श्री.डी.एस. पाटील, पर्यवेक्षक श्री.डी.बी सोनवणे, कनिष्ठ विभाग प्रमुख श्री.संजय पाटील उपस्थित होते.

यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते म्हटली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.डी.एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सौ.समिधा सोवनी यांनी केले. कार्यक्रमास दोन्ही विद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी, पालक, परिसरातील नागरीक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here