तिरंगा भारतमातेची “आन-बाण-शान”, शहिदांच्या आठवणी पुन्हा-पुन्हा जागृत व्हाव्यात

शहिदांच्या आठवणी पुन्हा-पुन्हा जागृत व्हाव्यात व नवीन पिढीला शहिदांची,क्रांतिकारकांची,थोर महात्म्यांची आणि पुर्वजांची आठवण निरंतर रहावी व इतिहास जागृत रहावा यादृष्टीकोणातुन 15 ऑगस्टला प्रत्येक घरावर तिरंगा फडकवुन देशाची आन-बाण-शान उंचावण्यासाठी सर्वांनीच अग्रेसर रहायला हवे.कारण तिरंगा भारतासाठी व भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी अनमोल रत्न आहे.कारण यातुनच क्रांतीची मशाल उदयास आली व 15 ऑगस्ट 1947 हा दिवस उजाडला. यात सुर्याचा प्रखर तेजोमय प्रकाश, चंद्राची शांतीमय प्रतीमा, लखलखत्या ताऱ्यांचे प्रकाशमय वातावरण निर्माण करणे आणि वायू देवतेच्या सहवासाने विराजमान होवून देशाच्या शुरवीरांना व क्रांतिकारकांना तिरंगा सांगतो की “मेरा देश महान”.

त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक राज्यांनी 15 ऑगस्टला तिरंग्या सोबतच वृक्ष लावण्याचा निर्धार करावा.यामुळे स्वतंत्रता दिवस अनंत काळापर्यंत सर्वांच्याच स्मरणात राहील व संपूर्ण भारतात आपल्याला हिरवागार गालिचा सर्वीकडेच दिसून येईल. 15 ऑगस्टचे स्वागत करण्यासाठी आपल्याला संपूर्ण नद्यांचा खळखळाट ऐकु येईल, समुद्र देवता आपल्या लाटांच्या खुशीने स्वागत करेल अशा प्रकारे स्थल,जल,वायु देवता 15 ऑगस्टच्या स्वागतासाठी सज्ज आहे.देशातील वाढते प्रदुषण व दिवसेंदिवस कमी होत असलेले ऑक्सिजनचे प्रमाण यामुळे पृथ्वीतलावरील संपूर्ण जीवजंतु भयभीत आहे.याकरीता स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रासह देशातील प्रत्येक राज्यांनी 15 ऑगस्टला एकाच दिवशी लाखोंच्या संख्येने झाडे लावण्याचा संकल्प  करावा.या वृक्षलागवडीमुळे देशातील वातावरण प्रफुल्लित होईल व आपले पुर्वज आशिर्वाद देतील आणि त्यांना अभिमान होईल की स्वतंत्र भारतात सर्वकाही ठीक आहे. वृक्षलागवडीमुळे गुरांना चारा, सर्वांना शुद्ध हवा व ऑक्सिजन मिळेण्यास मोठी मदत होईल.

आपल्या पुर्वजांनी अनेक कठीण प्रसंगांशी सामना करत 1947 ला देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यानिमित्त्याने देशात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने संपूर्ण भारतात जय्यत तयारी झाली आहे ही अत्यंत आनंदाची व स्वागतार्ह बाब आहे.देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक थोर महात्मे, क्रांतिकारक, जहालवादी नेते,मवाळवादी नेते यांच्या एकसुत्री कार्यक्रमाने व बलीदानानेच 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला.त्यामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात  मोकळा श्वास घेतो आहे.त्याकाळी स्वातंत्र्यासाठी घरा-घरातुन आवाज बुलंद व्हायचा व स्वातंत्र्यासाठी संघर्षमय वातावरण निर्माण करून संपूर्ण युवावर्ग इंग्रजांशी लोहा घेण्यासाठी काहीही करायला तयार रहायचे.आज आपल्याला आपल्या क्रांतिकारकांचे, शहिदांचे,थोरमहात्म्यांचे अनुकरण करून त्यांनी मिळवुन दिलेल्या स्वातंत्र्याची आठवण म्हणून प्रत्येकांनी 15 ऑगस्टला आप आपल्या घरावर तिरंगा फडकवीलाच पाहिजे असा प्रण देशाच्या 139 कोटी जनतेनी घेतला पाहिजे.असे जर झाले तर तिरंगा एवढ्या उंचावर गेलेला आपल्याला दिसेल की संपूर्ण जग आश्चर्य चकित होईल व म्हणतील खरोखरच भारत देश महान.

आज भारत विश्व गुरू आहे सोबतच जागतिक पातळीवर शांतीचे प्रतीक म्हणून जगात भारताची ओळख आहे.कारण जगाच्या पाठीवर भारत असा एकमेव देश आहे की याठिकाणी अनेक धर्माचे, पंथाचे,जातीचे लोक एकोप्याने रहातात. जेव्हा -देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा प्रश्न येतो तेंव्हा -तेव्हा सर्वच एकनिष्ठेने कार्य करतात.त्यामुळे आपआपल्या घरावर तिरंगा फडकवुन जगाला आपली ऐकता व अखंडता अवश्य दाखविली पाहिजे.कारण भारतातील छोटे-मोठे सर्वच जाणतात की देश स्वतंत्र करण्यासाठी शुरविरांना, क्रांतिकारकांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या, बलिदान द्यावे लागले,फासावर जावे लागले तेव्हाच भारत स्वतंत्र झाला.

आपण शुरविरांना, क्रांतिकारकांना, थोरमहात्म्यांना सुईच्या टोकायेवढीही मदत करू शकत नाही.परंतु 15 ऑगस्टला प्रत्येकांनी आपापल्या घरावर तिरंगा फडकवुन आपल्या पुर्वजाच्या आठवणी ताज्या अवश्य करू शकतो.आजही प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्यात आपल्या पुर्वजांच्या आठवणी आहेत व स्वाभिमान आहे यात दुमत नाही.कारण जोपर्यंत सुर्य-चंद्र-आकाश-पाताळ आहे तोपर्यंत भारत भुमितील प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्यवीरांना, शहिदांना, क्रांतिकारकांना आपल्या काळजात ठेवून स्मरणात ठेवतीलच.आपले पुर्वज आपल्याला कुठुनतरी अवश्य पहात असेलच त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ प्रत्येकांनी आपापल्या घरावर तिरंगा फडकवुन शहिदांना स्मरण केलेच पाहिजे व याच दिवसाचे औचित्य साधून प्रत्येकांनी एकतरी वृक्ष लावुन वाढत्या प्रदूषणावर मात करण्याचा प्रयत्न केला  पाहिजे.आज देशाची स्थल सेना, वायुसेना, नौसेना तिरंग्याचा स्वाभिमान अबाध्य रहावा यासाठी अहोरात्र देशाच्या सुरक्षेसाठी तत्पर दिसून येतात.त्यामुळे तिरंगा देशातील सिमावर्ती भागातील सैनिकांसाठी भारतमातेचा आत्मा आहे.शहिदांना, क्रांतिकारकांना,थोर महात्म्यांना माझा कोटी कोटी प्रणाम!जय हिंद! वंदे मातरम्! भारत माता की जय!

रमेश कृष्णराव लांजेवार

माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर

मो: 9921690779

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here