ड्रग्सपासून युवा पिढीला वाचवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा – पो. नि. नाईकवडी
दिनेश साळवे
80970 48244
नेरुळ : पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरुळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलात स्वातंत्र्यदिनी ध्वजरोहाणासाठी उपस्थित नेरुळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मनंद नाईकवडी यांनी आपल्या देशाला अस्थिर करणाऱ्या परकीय शक्तीला आणि विचारांना पायबंद घालण्याचे आवाहन केले.
आपल्याला आता स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. युवा पिढीला ड्रग्स नशेपासून वाचवले पाहिजे. देश सांभाळण्याची नैतिक जबाबदारी आपली आहे. चुकीच्या गोष्टींची माहिती पोलिसांना द्या. सायबर फ्रॉडला बळी पडू नका. ड्रग्स विरोधी आंदोलनात सहभागी व्हावे. असे आवाहन नाईकवडी यांनी केले. त्यांनी
शाळेतील उपक्रमांची स्तुती केली.
वेदांत नामदेव मोरे, विराट तुषार घोरपडे, गौरी अशोक आहेर या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचा इतिहास ओघवत्या उलगडून सांगितला.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
माजी कार्याध्यक्ष प्रा. कृ. ना. शिरकांडे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त निमित्त आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते , ४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले, अग्रवाल आयवेव्ह, नेरूळ त्यांच्या माध्यमातून नेत्र तपासणी करण्यात आली, डॉ. अभिषेक शिरकांडे सहकार्याने लायन हॉस्पिटल, सायन यांच्यातर्फे आरोग्य तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमास पुणे विद्यार्थी गृहाचे कुलसचिव दिनेश मिसाळ, मुख्याध्यापक गोरख कदम, सुवर्णा मिसाळ, श्रीजा नायर, मनीषा मुळीक, समन्वयक पांडुरंग मुळीक, पर्यवेक्षिका शोभा लवटे, अस्मिता सलगर, ज्येष्ठ माजी विद्यार्थी ज्ञानदेव लवटे तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.