तहसील कार्यालयात राष्ट्रध्वजाला मानवंदना.

तहसील कार्यालयात राष्ट्रध्वजाला मानवंदना.

कोपरगाव मध्ये तहसीलदार यांच्या हस्ते ध्वजारोहण.

बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो..

दैनिक मीडिया वार्ता.
सुनील भालेराव. अहिल्यानगर(शिर्डी.) 9370127037.

दि.15/8/25. रोजी. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये कोपरगाव तालुक्याचे आमदार मा. श्री.अशितोष दादा काळे यांच्या उपस्थितीमध्ये(79.) वा. भारतीय स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त तहसील कार्यालय कोपरगाव येथे आज तहसीलदार मा. श्री.महेशजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आमदार साहेबांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. व सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
🔹🔹🔹🔹🔹