पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून पती विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार.

431

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून पती विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार.

रायगड जिल्हा प्रतिनिधी
निलेश महाडिक
मो. 7722040387

रोहा येथे राहणारी मिल्लत नगर येथील सिमरन शेख हिने पती असिफ शेख याच्या विरोधात दिनांक ११ रोजी२५रोजी रोहा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे.याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार १७/१२ /२०२१ ते ११/८ /२५ या दरम्यान संतत चार वर्षे शारीरिक अत्याचार पतीकडून होत होता नवरा असिफ शेख वारंवार माझ्या चारित्र्यावर संशय घेऊन व मला शिवीगाळ मारहाण करून मानसिक व शारीरिक छळ केला माझा मोबाईल काढून घेतला माहेरी व नातेवाईकांना फोन करता यैत नव्हते तसेच मी २५ जून २५ दुसऱ्या वेळेला प्रेग्नेंट असल्याचे समजताच माझ्या नंणदेचा नवरा याचे तुझे प्रेम संबंध आहेत असा संशय घेऊन मला वारंवार त्रास देत असे तसेच प्रेग्नेंट असल्याचे समजल्यामुळे मला तुझ्या पोटातील बाळ नको असे बोलून जात असताना त्यांनी जाणीवपूर्वक पाठीमागून येऊन कमरेलाच मारून मला पाडली व मी पोटावर पडल्यामुळे पोटात असणारे २/८/२५ रोजी मला भरपूर त्रास झाला त्यामुळे मला दवाखान्यात घेऊन जा असे सांगितले असून देखील घेऊन गेले नाही त्यामुळे मला भरपूर रक्तस्त्राव झाला त्यामुळे मी झोपूनच होते या इसमाने १० नंतर नवरा घरी आला व सफेद रंगाची गोळी माझ्या तोंडात कोंबून पाणीओतले आणि गोळी घ्यावी लागली त्यामुळे मला मोठ्या प्रमाणात त्रास झाला आणि मध्ये त्यामुळे माझं एक दीड महिन्याचा गर्भ गेला माझ्या पतीचे दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर असल्याचे सांगितले आम्ही दुसरं लग्न करणार आहे मला तलाक दे असे सांगितले व मला रुम मध्ये कोंडून ठेवून बाहेरून कडी लावून इतर मुलींबरोबर बोलत असे या त्रासाला अखेरीस हे कंटाळले असून तीने पतीचे विरोधक तक्रार दिली असून गुन्हा रजी.नं.१७७ /२०२५भा.द.वि.२०२३चे कलम८५/८८/८९ लावण्यात आले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मारुती इरप्पा पाटील करीत आहेत.