जाजू प्राथमिक व माध्यमिक विद्यालय राणेनगर येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण घेतलेल्या मुलीच्या पालकास ध्वज फडकवण्याचा बहुमान
नाशिक जिल्हा प्रतिनिधी
ज्ञानेश्वर तूपसुंदर
मो. 8668413946
राणेनगर येथील श्री शारदा शिक्षण मंडळ संचलित लिलावती बालक मंदिर, जाजू प्राथमिक व माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ७९ वा स्वातंत्र्य दिन शाळेत मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात “मेरी बेटी, मेरा अभिमान” या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनी कु. शिवभक्ती मिरजगावे हिचा सन्मान करत जाजू माध्यमिक विद्यालयातून तिने दहावीच्या परीक्षेत 94.60 टक्के गुण मिळवून तिने शाळेचा गौरव वाढविला आहे. तिच्या यशाचा गौरव म्हणून तिचे वडील श्री.धनंजय मिरजगावे यांना ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला. ध्वजारोहणानंतर सर्वांनी राष्ट्रगीत गायन करून स्वातंत्र्य सेनानींना अभिवादन केले.
यानंतर पहिली ते चौथी आणि पाचवी ते दहावी या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व नृत्य सादर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रंगतदार व मनाला भावणाऱ्या या कार्यक्रमांनी उपस्थितांना भारावून टाकले. त्याचबरोबर देशभक्ती गीतावर आधारित कवायतींचे सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी शिस्त, एकजूट आणि राष्ट्रप्रेम यांचे दर्शन घडविले. या सादरीकरणांमुळे प्रेक्षकांमध्ये देशभक्तीचा जोश अधिक वाढला.
समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करून आनंद साजरा करण्यात आला. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच सहभागी झाल्याने हा सोहळा अधिकच संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. गिरीश नरगुंदे, चिटणीस सौ.मायावती बेलसरे, सहचिटणीस मा. रवींद्र आगळे सर, विश्वस्त रोशन जाजू, श्री. अमोल जाधव, नरेंद्र गंगाखेडकर श्री. शैलेश दखने,श्री. अशोक देशपांडे श्री उमरखान पठाण, श्री प्रदीप बनकर श्री बाळासाहेब काळे सौ. हिराबाई बोरसे तसेच पालक -संघ माता -पालक संघ यांचे पदाधिकारी तसेच प्राथमिक मुख्याध्यापिका सुनंदा भागवत मॅडम, माध्यमिक मुख्याध्यापक श्री. अजय पवार सर तसेच शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येऊन स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत देशभक्तीचा संदेश दिला.
देशभक्तीची उर्जा, सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे जाजू प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात साजरा झालेला ७९ वा स्वातंत्र्य दिन सोहळा उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी घर करून गेला.