“देशभक्ती फक्त घोषणांनी नाही… तर रक्ताच्या थेंबातही वाहू शकते! स्वातंत्र्य दिनी नेरळ व्यापारी फेडरेशनने हेच सिद्ध केले

“देशभक्ती फक्त घोषणांनी नाही… तर रक्ताच्या थेंबातही वाहू शकते! स्वातंत्र्य दिनी नेरळ व्यापारी फेडरेशनने हेच सिद्ध केले

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
9011199333

नेरळ, १५ ऑगस्ट – स्वातंत्र्य दिनानिमित्त नेरळ व्यापारी फेडरेशनतर्फे आज नेरळ चावडी नाक्याजवळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्थानिक व्यापारी, नागरिक आणि तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत [सकाळी 8 ते 10.30] पर्यंत 15 पिशव्या रक्तदान केले. ज्येष्ठ नागरिक भाई देसाई यांनी सांगितले की, रक्तदान हेच खरे जीवनदान असून समाजहितासाठी अशा उपक्रमांची गरज आहे.

यां शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र व रक्तदान कार्ड आणि अल्पोपहार देण्यात आला.