कोपरगाव मध्ये व्यापारी बांधवांची बैठक.

कोपरगाव मध्ये व्यापारी बांधवांची बैठक.

कोपरगाव मध्ये होणार एमआयडीसी.

दैनिक मीडिया वार्ता.
सुनील भालेराव.
कोपरगाव:शिर्डी.
9370127037.

अहिल्यानगर:दि.15/8/2025. अहिल्यानगर मधील कोपरगाव तालुक्यामध्ये भविष्यात एम.आय.डीसी.
होणार आहे. यासंदर्भात कोपरगाव तालुक्याचे आमदार मा.श्री.आशुतोष दादा काळे यांनी व्यापारी बांधवांची बैठक आयोजित केली. यामध्ये कोपरगावात होणाऱ्या एम.आय.डीसी.मध्ये सर्व व्यापारी बांधवांचा व उद्योजकांचा मोठा वाटा असावा.

यासाठी कोपरगाव मधील सर्व उद्योजक बांधवांनी जागा मागणीचे अर्ज एम.आय.डीसी. कडे सादर करावे.व जागा मागणीसाठी प्रयत्न करावे.
या विषयावर चर्चा झाली. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष. श्री.काकासाहेब कोयटे. व्यापारी संघाचे सदस्य व बांधव उपस्थित होते.