कोरोनाच्या भितीने रक्ताच्या नातेवाईकांनीच नाही स्वीकारलं रुग्णाचं पार्थिव.

अखेर.. सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अझहर यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसोबत मृत रुग्णाच्या पार्थिवावर अंत्य संस्कार केले.

बुलडाणा: कोरोनाच्या धास्तीमुळे मृत व्यक्तीचं पार्थिव स्वीकारण्यास अक्षरशः रक्ताचे नातेवाईक नकार देत आहेत. कोरोनामुळे माणुसकीचा हत्या होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
राज्यात कोरोना व्हायरसचा कहर दिवसेदिवस वाढत आहे. परिणामी नागरिकांमध्ये कोरोनाबाबत मोठी भीती मनामध्ये आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे मृत व्यक्तीचं पार्थिव स्वीकारण्यास अक्षरशः नातेवाईक नकार देत आहेत. कोरोनामुळे माणुसकीचा हत्या होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
अशीच एक घटना सोमवारी बुलडाण्यात घडली. कोरोनामुळे एका 45 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रुग्णाच्या नातेवाईकांनी अक्षरश: मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. अखेर बुलडाणा शहरातील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अझहर यांनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसोबत मृत रुग्णाच्या पार्थिवावर अंत्य संस्कार केले.
संपूर्ण देशात कोरोनानं हाहाकार उडाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात देखील वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसोबत रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण देखील 64 वर पोहोचले आहे. डोनगाव येथील एका कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे बुलडाणा येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अझहर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत नगरपरिषदे कर्मचाऱ्यांच्या सोबत जाऊन पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. मोहम्मद अझहर यांनी हिंदू व्यक्तीचे अंत्यसंस्कार करून सामाजिक एकतेचे दर्शन घडवलं आहे.
देशावर आजपर्यंत अनेकदा साथीच्या आजारांचं संकट आलं आहे. मात्र, या कोरोनामुळे तर रक्ताच्या नात्यांचे लोक देखील पार्थिव स्वीकारण्यास घाबरत असल्याने माणुसकी लोप पावत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं मोहम्मद अझहर यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here