*अवैध दारु तस्करांला नागपुर पोलीसांनी केल तडीपार*
अवैध दारु विक्रीचे अनेक प्रकरणे नागपुरच्या अनेक पोलिस स्टेशनमधे त्यांवर होते दाखल.
नागपुर:- आज नागपुर येथील जरीपटका पोलिस स्टेशनने अवैध रित्या दारु विक्री करना-या तस्करांला तडीपार केल्याची प्रेस नोट प्रकाशित करुन कळवळी आहे.
सुमीत उर्फ जॉन सुमीत शिंदे वय 27 राहणार मेकोसाबाग, ख्रीश्चन कॉलोनी, जरीपटका नागपुर शहर यांच्या वर माघील अनेक दिवसा पासुन शहरांमध्ये अवैध धंदे दारु विक्री तक्रारी दाखल होत्या. अवैधरित्या दारु विक्रीची 14 गुन्हे, व शरिराविरुध्य चे 2 गुन्हे दाखल होते.
सुमीत उर्फ जॉन सुमीत शिंदे हा अवैध दारु विक्री व गुन्हेगार प्रकृतीचा असल्यामुळे त्यांचा विरुध्द श्री. निलोत्पल पोलिस उपआयुक्त परिमंडळ क्रमांक 5 यांच्या आदेशाने सहायक पोलिस आयुक्त पी. एम. कार्यकर्ते जरीपटका विभाग व खुशाल तीजारे वरिष्ठ पुलिस निरीक्षक पोलिस स्टेशन जरीफटका नागपुर यांचा मार्गदर्शनाखाली सुमीत उर्फ जॉन शिंदे या गुन्हेगारा विरुद्ध हदपार तडीपारचा प्रस्ताव पोलिस हवालदार जवानसिंग पडवाल, पोलिस शिपाई पदमाकर उके, महिला पोलिस शिपाई विनया शामकुवर पोलिस स्टेशन जरीपटका यांनी तयार करुन पोलिस उप आयुक्त परिमंडळ 5 यांना पाठविले असता त्यांनी सुमीत उर्फ जॉन शिंदे यांचावर आदेश काढून त्याला जरीपटका नागपुरची हदपार तडीपार आदेश तामील करुन त्याला मध्य प्रदेश मधिल छिंदवाड़ा येथील सिटी कोतवाली पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणार्या त्यांचा नातेवाईका कडे सोडण्यात आले.