*बुलडाणा बंधाऱ्यात पोहताना तीन युवक बुडाले*

बुलडाणा:- सिंदखेडराजा तालूक्यातील चांगेफळ गावाजवळील बंधाऱ्यात पोहायला गेलेले तीन युवक पाण्यात बुडाल्याची दु:खद घटना आज सोमवारी दुपारी घडली. यापैकी एका युवकाचा मृतदेह सापडला असून अन्य दोघांचे शोधकार्य सुरू आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अलिकडेच झालेल्या जोरदार पावसामुळे शेतशिवारातील तलाव, बंधारे पाण्याने तुडूंब भरलेले आहेत. चांगेफळ येथील एका बंधाऱ्यात पोहण्यासाठी आज तीन युवक गेले होते. त्यातील गंगाराम भालेराव (वय ३०) हा बुडत असल्याचे पाहून ज्ञानेश्वर भालेराव हा त्याला वाचवण्यासाठी धावला. हे दोघे बुडताना पाहून सोबतचा तिसरा आलेला युवक पुढे सरसावला, दुर्दैवाने तोही बुडाला अशी बुडण्याची साखळी झाली.
या घटनेची माहिती कळताच गावकरी तात्काळ बचाव कार्यासाठी गेले. पण तोवर उशिर झाला. त्यांमुळे या तिघांच्या बुडून मृत्यु झाला या घटनेने सर्विकडे हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here