ग्रामपंचायत मध्येच केले ग्रामसेविकेला कुलूपबंद…
बाबापूर येथील घटना

बाबापूर येथील घटना
साहिल महाजन यवतमाळ 9309747836
शिरपूर पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या बाबापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करीत असलेल्या ग्रामसेविकेला गावातील ४५ वर्षीय इसमाने चक्क दाराला कुलूप लावून कोंडल्याची घटना सोमवारी घडली आहे. ग्रामसेविकेने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील बाबापूर येथील ग्रामपंचायत मध्ये अस्मिता गणेश काळे ही महिला ग्रामसेवक कार्यरत आहे. नित्यनेमाने ग्रामसेविका ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करण्यासाठी आल्या होत्या.साडेअकरा चे सुमारास गावातील सचिन मोहन पिदूरकर कार्यालयात आला व गावातील शाळकरी मुलांसाठी एसटी बस बाबत ठराव का दिला नाही असा वाद घातला असता याबाबत लेखी अर्ज करा असे सांगताच माहिती अधिकाराखाली माहिती मागितली ती मिळाली नाही असे ओरडून शिवीगाळ करीत होता. प्रसंगी कार्यालयातील टेबलावर असलेले कुलूप घेऊन दार बाहेरून बंद करून कुलूप लावले त्यावेळी शिपाई,संगणक चालक, व गावातील दोन व्यक्ती आत होते.सचिनची शिवीगाळ सुरूच होती. प्रसंगी सोबत असलेल्या लोकांना बाहेर निघा” मॅडम”ला एकटीला बंद करून ठेवायचे आहे.असे ओरडून सांगत होता. सचिन ने ग्रामपंचायत मध्ये कामकाज करीत असलेल्या ग्रामसेविकेला कार्यालयात कुलूपबंद करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार शिरपूर पोलिसात दिल्यावरून सचिन पिदूरकर विरुद्ध भा दं वि ३५३,४४२,५०४,५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहे.
ग्रामसेवक संघटनेचे कामबंद आंदोलन
सदर घटनेचा निषेध नोंदवीत ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन सदर इसमाला अटक होत नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन करणार असल्याचे निवेदन सादर केले आहे.