ओबीसींचे आरक्षण येईपर्यंत स्वस्थ बसणार नाही – हंसराज अहीर

✍संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800
सविस्तर वृत्त खलील प्रमाणे आहे
चंद्रपूर : शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. आघाडी सरकारने वेळीच इंपेरिकल डेटा कोर्टाला दिला असता तर आज आमच्या ओबीसी बांधवांवर निवडणुकीतून हद्दपार व्हायची वेळ आली नसती. धुळे नंदुरबार अकोला वाशिम व नागपूर येथील निवडणूका लागल्याने तेथील ओबीसी बांधवांना ओबीसी प्रवर्गातून निवडणुक लढवता येणार नाही हा फार मोठा अन्याय आहे असे दि. 15 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा व महानगर व्दारा आयोजित धरणे आंदोलन कार्यक्रमात बोलतांना हंसराज अहीर यांनी सांगीतले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार केवळ ओबीसी समाजासोबत आहो असा दिखावा करून राज्यातील ओबीसी समाजाची शुद्ध फसवनुकच केली. 4 मार्च 2021 रोजी या 5 जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गाचे जिल्हा परिषद सदस्य यांना अपात्र ठरविन्याच्या निर्णय जेव्हा न्यायालयाने दिला.तेव्हापासून राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस व भारतीय जनता पार्टीचे नेते वारंवार आघाडी सरकारला सांगत होते की जर राज्यातील ओबीसी चे राजकीय आरक्षण टिकवायचे असेल तर राज्यात मागासवर्ग आयोग गठित करून त्यामाध्यमातून इम्पेरिकल डेटा संकलित करावा व न्यायालयात सादर करावा कारण तसे निर्देश न्यायालयानी 13 डिसेंबर 2019 रोजी राज्य सरकारला दिलेले होते परंतु सरकारनी हेतुपुरस्सर पणे या विषयाकडे दुर्लक्ष केले व जातिनिहाय जनगणना करावी,राज्यातील आघाडी सरकारला सांगत होते